नागपूर - महाराष्ट्र सरकारने मेगा भरतीची घोषणा केली. त्याची पूर्तता करण्यासाठी लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच घाईने नोकरभरतीची जाहिरात देखील काढली. मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांना काढून नव्यांची भरती मतांसाठी आहे का ? असा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.
नागपुरात रोजगार भरती ही मतांसाठी की बेरोजगारांसाठी ; आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल - job recruitment
जुन्या कर्मचाऱ्यांना काढून नव्यांची भरती मतांसाठी आहे का ? असा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.
![नागपुरात रोजगार भरती ही मतांसाठी की बेरोजगारांसाठी ; आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2693394-28-69f45810-0295-4e4d-b1c7-0390a7cb8ec8.jpg)
आरोग्य कर्मचारी
आरोग्य कर्मचारी
जिह्यात १५० पेक्षा जास्त आरोग्य सेविका गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. परंतु, त्या सेविकांना नोकरीवर नियमित न करता राज्य सरकारने जिल्ह्यातील २३८ आरोग्य सेवकांच्या पदभरतीसाठी जाहिरात काढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पदभरतीची जाहिरात काढून मतांसाठी आमच्या पोटावर लाथ मारली जात आहे, असा आरोप या आरोग्य सेविकांनी केला आहे. ही जाहिरात बंद करावी आणि १५ वर्षांपासून काम करण्याऱ्या सेविकांना नियमित करावे, अशी मागणीही सेविकांनी केली आहे.