नागपूर -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ग्रामीण भागाची गरज ओळखून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिसरात रुग्णवाहिकेचा चालकांना रुग्णवाहिकेच्या चाव्या देऊन हिरवा झेंडा दाखवाल्या नंतर रुग्णवाहिका प्राथमिक केंद्राच्या दिशेने रवाना झाल्या.
तिसऱ्या लाटेत या रुग्णवाहिका नक्कीच दिलासादायक -
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात अनेकांना रुग्णवाहिका न मिळाल्याने जीव गमवावा लागला. ग्रामीण भागातून शहरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत या रुग्णवाहिका नक्कीच दिलासा देणार्या ठरतील. अशी आशा व्यक्त केली.