महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात राज्य सरकारच्या विरोधात पहिला मोर्चा - Protest rally against newly form government

'महाविकास आघाडी' सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील हिंगणा येथे महानिषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.

Protest rally in Hingana nagpur
नागपूरच्या हिंगण्यात राज्य सरकारच्या विरोधात पहिला मोर्चा

By

Published : Dec 10, 2019, 12:03 AM IST

नागपूर - 'महाविकास आघाडी' सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील हिंगणा येथे महानिषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.

नागपूरच्या हिंगण्यात राज्य सरकारच्या विरोधात पहिला मोर्चा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. मात्र, अद्यापही मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला असल्याने अनेक मतदार संघाची कामे रखडली आहेत. गेल्या सरकारच्या काळात मजुरीच्या अंतिम प्रक्रियेत असलेल्या कामांना या सरकारमध्ये मंजुरी मिळेल अशी आशा होती. मात्र, हे सरकार सुरू असलेल्या कामांना स्थगिती देत आहे. त्यामुळे भाजप आमदार समीर मेघे यांनी मतदारसंघातील लोकांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. जनतेच्या हिताच्या विकासकामांना आपल्या स्वार्थासाठी स्थगिती देणाऱ्या या सरकारला जनताच उत्तर विचारणार असल्याची प्रतिक्रिया समीर मेघे यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details