महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Oral Health : लहान मुलांमध्ये व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ ; लहान मुलांचे मौखिक आरोग्य जपा -डॉ. रितेश कळसकर - Protect Childrens physical And Mental Health

तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या माणसांमधील हीच व्यसनाधीनता आता लहान मुलांमध्ये सुद्धा वाढत आहे. ग्रामीन भागात तर लहान मुलांमध्ये मौखिक आजाराचे प्रमाण हळू-हळू वाढत ( Protect Childrens physical And Mental Health ) आहे त्यामुळे पालकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत दंत चिकित्सकांनी व्यक्त केले आहे.

Protect children's oral health
मुलांचे मौखिक आरोग्य जपा

By

Published : Nov 9, 2022, 1:33 PM IST

नागपूर :लहान मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे ( Protect Childrens physical And Mental Health ) जितके महत्त्वाचे आहे,किंबहुना त्यापेक्षाही अधिक जास्त महत्वाचे आहे लहान मुलांचे मौखिक आरोग्य जपणे. मात्र,दुर्दैवाने पालकांना याकडे फारसे गंभियाने बघत नसल्यामुळे लहान मुलांमध्ये ओरल कैबीटीचा धोका वाढतो आहे. प्रामुख्याने 1 ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुलांमध्ये हिरड्यांमध्ये कीड लागण्याची प्रमाण सर्वाधिक आहे. खेळताना जबड्याला मार लागणे सामान्य असले तरी त्याचा परिणाम दातांवर होतो परिणामी पुढे त्यातून गंभीर आजाराचा जन्म होऊ शकतो. याशिवाय लहानं मुलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याची सवय जडत असल्याने विदर्भातील मुलांचे मौखिक आरोग्य धोक्यात आले आहे अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालयात व रुग्णालयाचे बाल दंत विभाग प्रमुख डॉक्टर रितेश कळसकर ( Dentist Ritesh Kalaskar ) यांनी दिली आहे.

लहान मुलांमध्ये व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ ; लहान मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्या बरोबरचं मौखिक आरोग्य जपा



ग्रामीण भागात परिस्थिती विदारक :शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लहानं मुलांमध्ये खर्रा,गुटखा यासह तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये मौखिक आजारचे प्रमाण 30 टक्यांमध्ये अधिक आहे, तर आदिवासी भागात हे प्रमाण 60 टक्यांपेक्षा अधिक दिसून येत आहे. मुळात ही समस्या निर्माण करण्याचे काम त्या लहानं मुलांच्या घरातूनचं होते. वडील, भाऊ किंव्हा समाजातील वडीलधारी मंडळी दिवसभर खर्रा, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सर्रासपणे सेवन करत असल्यामुळे लहान मुले तंबाखूजन्य पदार्थांकडे आपसूकचं आकर्षित होतात,परिणामी लहान मुलांमध्ये सुद्धा व्यसनाधीनता वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.



50 ते 70 टक्के मुलांच्या दाताला कीड :नागपूरच्या शासकीय दंत रुग्णालयात ( Government Dental Hospital Nagpur ) येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 50 ते 70 टक्के लहान मुलांच्या दाताला कीड लागली असल्याचे दिसून आहे. याशिवाय खेळताना किव्हा पडल्यामुळे तोंडाला मार लागल्यामुळे 30 ते 40 टक्के लहान मुलांमध्ये दंत समस्या दिसून येत असल्याची माहिती डॉ रितेश कळसकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details