नागपूर - भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता उपलब्ध असल्याचा दावा 'स्काय वॉच' ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी मोहिमेसंदर्भात आमच्या प्रतिनिधीने चोपणे यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता - प्राध्यापक सुरेश चोपणे - अंतराळ
चांद्रयान 2 मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी होते की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच इस्रोने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली.
भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता - प्राध्यापक सुरेश चोपणे
चांद्रयान-2 मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी होते की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच इस्रोने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली.
चांद्रयान-2 मोहिमेचे, वैज्ञानिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठे फायदे असल्याचेदेखील स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताकडे या क्षेत्रात अचूकता आली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.