महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदिप कवाडे यांना कोरोनाची लागण

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीच त्यांचे वडील प्रा. जोगेंद्र कवाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयदिप कवाडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jaydeep kawade
जयदिप कवाडे

By

Published : Sep 6, 2020, 10:52 PM IST

नागपूर - पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधीच त्यांचे वडील प्रा. जोगेंद्र कवाडे यांना ही कोरोनाची लागण झाली होती. जयदिप कवाडे यांना नागपुरातील किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचार सध्या सुरू असल्याची माहीती डॉक्टरांनी दिली आहे.

नागपुरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला गृह विलगीकरण करुन घेतले होते. जोगेंद्र कवाडे यांचानंतर आता त्याचा पुत्र व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांना ही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

शनिवारीर (दि. 5 सप्टें) त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्वतः जयदिप कवाडे यांनी स्पष्ट केले आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागपुरातील किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय खास लक्षणे नसल्याने प्रकृती स्थिर असल्याची माहीती डॉक्टरांनी दिली आहे. दररोज अनेक राजकीय नेतेमंडळीचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळीच्या संपर्कात राहणाऱ्यांनाही या परिणामाला पुढे जावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय शहरातील रुग्णांचा आकडाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावे, असे आवाहन जयदिप कवाडे यांनी केले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहीती नुसार ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ते लवकरच बरे होतील हा आशावाद किंग्सवेच्या प्रमुख डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -नागपुरात कोरोनाचा हाहाकार, सलग पाच दिवसात ८५८४ रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details