महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime : बलात्कारी वसंत दुपारेला फाशी होणारच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दया अर्ज फेटाळला - चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम वसंत दुपारेची दया याचिका राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आज फेटाळून लावली आहे. यापूर्वी २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने देखील आरोपी वसंत दुपारेने केलेल्या घृणास्पद कृत्याची शिक्षा ही फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली जाऊ शकत नाही असा निर्वाळा देत दुपारेची शिक्षा कायम ठेवली होती.

Draupadi Murmu
Draupadi Murmu

By

Published : May 4, 2023, 6:56 PM IST

नागपूर :चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या वसंत दुपारेची दया याचिका राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. त्यामुळे आरोपी वसंत दुपारेच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला असला तरी, आरोपी पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो. पीडित चिमुकली ही ६३ वर्षीय आरोपी वसंत दुपारे यांच्या घराशेजारी राहत होती. त्यामुळे तिचा आजोबा या नात्याने वसंत दुपारे यांच्यावर भाबडा विश्वास होता.

दगडांनी ठेचून हत्या :२००८ साली जेव्हा वसंत दुपारेने हा गुन्हा केला तेव्हा त्याचे वय ५५ इतके होते. आरोपीने शेजारच्या चार वर्षीय चिमुरडीला चॉकलेट आमिष दाखवून सोबत फिरायला नेले होते. त्यानंतर अमानुष बलात्कार केल्यानंतर तिची दगडांनी ठेचून हत्या केली. या प्रकरणात वसंत दुपारेला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील आरोपीची शिक्षा कायम ठेवली होती.

न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण : त्यावेळी न्यायालयाने वसंत दुपारेच्या संदर्भात निरीक्षण नोंदवले होते. आरोपी वसंत दुपारे याने चार वर्षीय मुलीच्या विश्वासाचीही निर्घृण हत्या केली आहे. वसंत दुपारे कोणत्याही मानसिक ताणाखाली नव्हता, त्यामुळे तो असं पुन्हा करणार नाही, असे म्हणू शकत नाही, आरोपी हा समाजासाठी घातक ठरू शकतो असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली होती.

राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली : आरोपी वसंत दुपारेच्या दया याचिका संदर्भात राष्ट्रपती सचिवालयाला या वर्षी २८ मार्च रोजी गृह मंत्रालयाची शिफारस प्राप्त झाली होती. त्यावर २८ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली आहे आहे.

असा आहे घटनाक्रम :२००८ साली आरोपी वसंत दुपारेने चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. आरोपीला तत्काळ अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला होता. २६ नोव्हेंबर २०१४ साली जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी वसंत दुपारेला फाशीची शिक्षा दिली. २०१६ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षा कायम ठेवली. २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा शिक्षा कायम ठेवली.

हेही वाचा - Sharad Pawar : 'लोक माझे सांगाती'मधून उद्धव ठाकरे विरोधात शरद पवारांची उघड भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details