महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारला कोरोना लसीकरणाचा देखावा; नागपुरातील उपक्रम - presents vaccination theme on ganeshotsav nagpur news

लसीकरण मोहिमेला हातभार लावत नागरिकांनी लसीकरण करून देण्याचेही काम मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेकजण या मोहिमेत सहभागी झाले. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भविकांवर आरोग्य तपासणी आणि डेंग्यूचा प्रकोप लक्षात घेऊन इच्छुकांनी रक्तदान करता येईल, अशी व्यवस्थाही मंडळाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये काहींनी लसीकरण तर काहींना आरोग्य तपासणी करुन घेत रक्तदान मोहिमेत सहभाग घेतला.

presents vaccination theme on ganeshotsav occasion nagpur
गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारला कोरोना लसीकरणाचा देखावा

By

Published : Sep 22, 2021, 4:26 PM IST

Updated : Sep 22, 2021, 5:15 PM IST

नागपूर - कोरोपासून बचाव व्हावा म्हणून देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात असतांना याच थिमला धरून विघ्नहर्ता वॅक्सिनेशन गणेश ही थीम राबवण्यात आली. नागपूर शहराच्या हिलटॉप परिसरातील एकटा गणेश मंडळाकडून यंदाही विशेष सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम ठेवत वॅक्सिन घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन गणेशोत्सवातुन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला, अशी माहिती मंडळाचे संयोजक, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत लोकांना एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचा संदेश दिला. हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील 30 वर्षांपासुन दर वर्षी नवनवीन संकल्पना राबविण्याचे काम एकता गणेश मंडळाच्या वतीने केले जाते. यात मागील वर्षीही कोरोनाचे संकट कोरोना हॉस्पिटल संकल्पना राबवण्यात आली होती. यंदा लसीकरण मोहीम देशभरात सुरू असल्याने लोकांना प्रोत्साहन देण्यात आले. यासोबतच अजूनही अनेक जण लसीकरणाबद्दल असलेल्या गैरसमजातून लसीकरण करून घेण्यास पोहचत नाही, अशा लोकांना संदेश देऊन लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

मंडळाकडून लसीकरणाची व्यवस्था -

लसीकरण मोहिमेला हातभार लावत नागरिकांनी लसीकरण करून देण्याचेही काम मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेकजण या मोहिमेत सहभागी झाले. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भविकांवर आरोग्य तपासणी आणि डेंग्यूचा प्रकोप लक्षात घेऊन इच्छुकांनी रक्तदान करता येईल, अशी व्यवस्थाही मंडळाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये काहींनी लसीकरण तर काहींना आरोग्य तपासणी करुन घेत रक्तदान मोहिमेत सहभाग घेतला.

अनोख्या उपक्रमांची पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये घेतली दखल -

मंडळाकडून मागील 30 वर्षांपासून धार्मिक सामाजिक एकतेचे संदेश दिला जात आहे. सोबत लोकांनाच्या अनुषंगाने कधी देखाव्यातून जनजागृती तर कोरोना काळात कोरोना केअर हॉस्पिटल उभारून रुग्ण सेवा अशा पद्धतीचे उपक्रम सातत्याने राबवले जातात आहे. 2020मध्ये मोठया संख्यने कोरोनाचे संकट असताना रुग्णसेवा करण्यात आली. त्या उपक्रमाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये बोलताना करून मंडळाचे कौतुक केले.

विघ्नहर्ता वॅक्सिनेशन गणेशाचे दर्शनाला भाविकांचे आकर्षण -

गणेशाची मूर्ती ही चार फुटापेक्षा अधिक नसल्याने यात उंची जास्त नसली तरी यावेळी गणरायाची मूर्ती ही झोपून आरामशय्येत होती. यावेळी त्यांच्या पायाशेजारी डॉक्टर, उंदीर हा हातात लस घेऊन बाप्पाला लस घेण्याचे आवाहन करत आहे. तसेच रिद्धी सिद्धी यासुद्धा आग्रह करत असून एक नर्स बाजूला उभी आहे. यावेळी उपलब्ध कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसीचा देखावाही ठेवलेला आहे. कोरोनाची लस देणारे इंजेक्शन आणि सुईला कळसाचे स्वरूपात उभारण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

नेमके विसर्जन कुठे होणार -

अनंत चतुर्दशीनंतरही अद्याप विसर्जन झाले नाही. यात 24 सप्टेंबरला मंडळाकडून विसर्जन करण्यात येणार आहे. प्रशासनाने यंदा गणपती मूर्त ही चार फुटापेक्षा उंच असू नये, असा नियम लावला असताना एकटा गणेश मूर्तीची उंची जरी चार फूटपेक्षा जास्त नसली तरी रुंदी मात्र जवळपास 20 फूट आहे. यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येणे शक्य नाही. यात आता नियमांचे पालन करून कशा पद्धतीने विसर्जन होणार? याकडेही लक्ष लागले आहे.

Last Updated : Sep 22, 2021, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details