नागपूर :परमवीर सिंग 14 महिने फरार होते. कैटने तीन वेळा परमवीर सिंग यांच्या निलंबनाबद्दल राज्य सरकारला विचारणा केली. मात्र, राज्य सरकारने काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे कैटने एकतर्फी निर्णय देत आणि परमवीर सिंग यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश दिल्याचा आरोप प्रवीण कुंटे यांनी केला आहे. परमवीर सिंग यांच्या आरोपांचा आधार घेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता परमवीर सिंगवर 10 पेक्षा जास्त गंभीर आरोप आहे. परमवीर सिंग यांचे निलंबन रद्द होणे घातक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे म्हणाले आहेत.
आवाज दाबण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस : भारतीय जनता पार्टी व सरकारच्या विरोधात जो बोलतो त्यांचा आवाज दाबण्याचे काम राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. यासाठी ते विविध केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करत असून अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई, नवाब मलीक यांची अटक तसेच हसन मुशरीफ यांच्या घरावर छापेमारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस हा याबद्दलचा सबळ पुरावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील राज्यभर फिरुन भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. जो आपल्या विरोधात बोलेल त्याला आत टाका हा भाजपाचा एकसुत्री कार्यक्रम असून राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अश्या हकुमशाही प्रवृत्तीकडे न झुकता रस्त्यावर उतरुण संघर्ष करीत राहील अस ते म्हणाले आहेत.
एक लाखांचं बक्षीस देऊ :राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर सातत्याने विरोधी पक्षांचे तोंड दाबण्यासाठी ईडी, सीबीआयसह केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातो आहे. या सात वर्षात एकही भाजप नेत्यांच्या विरोधात ईडी किव्हा सीबीआयकडून चौकशी करण्यात आली नाही. जर कुणी असा एक तरी भाजप नेता दाखवेल ज्याची चौकशी सुरू असेल त्याला एक लाखांचं बक्षीस देऊ, असे प्रवीण कुंटे म्हणाले आहेत.