नागपूर - प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करतात. तसेच वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही निवडणुकीत भाजपला जिंकविण्यासाठी करण्यात आली, असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ता मिलिंद पखाले यांनी केला आहे. त्यांनी आज पूर्व विदर्भातील अनेक नेत्यांसोबत पक्षाला रामराम ठोकला असून यावेळी बोलतना त्यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर संघ आणि भाजपला मदत करतात; वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा गंभीर आरोप - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करतात. तसेच वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही निवडणुकीत भाजपला जिंकविण्यासाठी करण्यात आली, असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ता मिलिंद पखाले यांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून मी पक्षात काम करत असून यंदाची निवडणूक ही अटीतटीची होती. मात्र, पक्षाने आवश्यक ती मेहनत घेतली नाही. कारण पक्षाअंतर्गत भाजपला मदत केली गेली. राज्यात ताकद नसताना देखील राज्यातील ४७ जागावर उमेदवारांना रिंगणात उतरवून त्यांनी आरएसएसला सरळ पाठिंबा दिला. भाजपच्या विजयासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितांची मते खाण्याचे काम केले. वंचित बहुजन आघाडीच्या ४७ जागांपैकी एकही जागा लोकसभेच्या निवडणूकीत निवडणून येणार नसल्याचे भाकितही पखाले यांनी वर्तवले आहे.