नागपूर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबडकरांनी हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
भारताने हल्ला केला ही चांगली गोष्ट - प्रकाश आंबेडकर - पाक व्याप्त काश्मीर
भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे प्रकाश आंबडकरांनी समर्थन केले आहे.
प्रकाश आंबेडकर
ते पुढे म्हणाले, की भारताने दहशतवादी तळावर हल्ले केले ते सरकारने अजून जाहीर केले नाही, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही उत्तर देऊ शकतो, हे सरकारने दाखवून दिले, ही चांगली परिस्थिती आहे. पाकिस्तान कंगाल आहे, यापुढे भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली पाहिजे. युनायटेड नेशनचे सैन्य आणले पाहिजे, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.