महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर 0.4 वर, 30 नवीन बाधितांची नोंद

नागपूर जिल्ह्यात सोमवारी 6 हजार 929 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. नागपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर 0.4 वर पोहोचला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jun 15, 2021, 6:35 AM IST

नागपूर- नागपूर जिल्ह्यातील एप्रिल महिन्यात प्रचंड वाढलेला कोरोना बधितांचा आकडा आता घटला आहे. पहिल्या लाटेनंतर निच्चांक आकडा म्हणून 30 जण कोरोनाबाधित झाल्याचे सोमवारी आलेल्या अहवालात दिसून आले. यात शहरात 18 तर ग्रामीण मध्ये 10 जण आढळून आले आहेत. यासोबत पॉझिटिव्हीटी दर खालावत 0.4 वर आलेला आहे.

सध्याची कोरोना परिस्थिती

नागपूर जिल्ह्यात सोमवारी 6 हजार 929 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 10 बाधित रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनामुळे 3 जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात 1, तर ग्रामीण भागात 0, तर जिल्हाबाहेरील 2 जण दगावले आहे. तेच 193 जणांपैकी शहरात 143, तर ग्रामीण भागात 50 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात 361 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून, 1 हजार 409 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहे.

आतापर्यंतची परिस्थिती

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 1 हजार 770 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 445 जण कोरोनाबाधित झाले होते. यापैकी 4 लाख 65 हजार 668 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 9007 वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.74 टक्क्यांवर वर असून, रोज यात वाढ होत आहे.

सहा जिल्ह्यात 110 बाधित

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 449 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 110 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 11 जणांचा कोरोनाचे बळी गेला आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 339 अधिकचे रुग्ण कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.4 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 0.96 वर आला आहे.

हेही वाचा -मोफत धान्यांसह लसीकरणाकरिता सरकारवर अतिरिक्त १.०५ लाख कोटींचा भार- एसबीआय

ABOUT THE AUTHOR

...view details