नागपूर -प्रणय ठाकरे या 21 वर्षीय तरुणाचा पतंगाच्या नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्यानंतर आता नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदी करणाऱ्यां विरोधात पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. आज (दि. 13 जाने.) पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. दिवसभरात 33 मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे.
मकर संक्रांतीच्या काळात दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्यानंतर आज शहरात विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. जे नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करताना आढळून आलेत त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येणाऱ्या काळात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा चा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ