नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदारावरचाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना चार दिवसांपूर्वीघडली होती. रवी चौधरी असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून पोलिसांनी आतापर्यंत 4 सराईत आरोपींना अटक केली आहे.
नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानमध्ये पोलीस हवलदार रवी चौधरी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. चित्रपटात घडते तसेच गुन्हेगार पोलिसाचा रस्त्यावर पाठलाग करत त्याच्यावर चाकूने हल्ला करतानाचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. आजूबाजूला रस्त्यावर वर्दळ सुरू असतानाही कोणीही पोलिसाच्या बचावास येत नाही, हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कमलेश मेश्राम, अमान खान, कपिल रंगारी यासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे.