नागपूर - मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानाकडून मोबाईलची बॅटरी ( police Seize Mobile Battery From Prisoners ) जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा कारागृहात बंद असलेल्या बंदिवानांकडे मोबाईल, बॅटरी आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. बंदिवानांना कारागृहात ( Nagpur Central Jail ) परत नेत असताना बंदिवानांजवळ मोबाईलची बॅटरी आढळून आली आहे. याआधी देखील कोर्टातून नेताना बंदिवानांनाच्या मार्फत तुरुंगात मोबाईल पुरवठा होत असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात ( Dhantoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे.
Mobile Battery Seize From Prisoner : नागपूर कारागृहातील बंदिवानांकडून मोबाईलची बॅटरी जप्त, अगोदरही उघडकीस आले होते प्रकार - धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कारागृहातील बंदिवानांकडे मोबाईलची बॅटरी ( police Seize Mobile Battery From Prisoners ) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही कारागृहात बंदिवानांकडे ( Nagpur Central Jail ) अमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यासह बंदिवानांच्या टोळ्यांमध्ये मारहाण झाली होती. या बंदिवानाला न्यायालयातून परत आणताना त्याच्याकडे बॅटरी ( Dhantoli Police Station) आढळून आल्याने पोलीस चक्रावले आहेत. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृहातील कर्मचाऱ्यांचा सहभागमध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थ पुरवले जात आल्याच्या घटना अनेकदा उघड झाल्या आहेत. एवढेच नाही तर कारागृहात अनेक मोबाईलचे सिग्नल अॅक्टिव्ह ( Mobile Signal Active ) असल्याचे पुरावे नागपूर शहर पोलिसांना मिळाले होते. यामध्ये कारागृहातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला आहे. यापूर्वी बंदिवानाला चरस पुरवल्याप्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याला ( Police Constable Suspended In Nagpur Jail ) निलंबीत करण्यात आले होते. तर बंदिवानाच्या दोन गटात हाणामारी झाल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृह ( Prisoners Dispute In Nagpur Central Jail ) चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणी दोन गटात झालेल्या मारहाणीत तीन बंदिवान गंभीर जखमी झाले होते. त्यासह न्यायालयाने तीन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानेही नागपूर कारागृह चांगलेच चर्चेत होते.
पुन्हा सर्जिकल स्टाइकची गरजकारागृहातील बंदिवानांना कर्मचारीच गांजा ( Police Constable Provide Drugs To Prisoner ) आणि अमली पदार्थ पुरवत असल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. याबाबतच्या गोपनीय माहितीच्या आधारे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नागपूर पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात ( Nagpur Police Raid In Central Jail ) छापेमारी करत ‘सर्जिकल स्टाइक’ केली होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Police Commissioner Amitesh Kumar ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित ( DCP Chinmay Pandit ) यांच्या नेतृत्वातील सुमारे ३५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कारागृह पिंजून काढले होते. त्यावेळी पोलिसांना फारसे काही मिळाले नव्हते. मात्र, आता पुन्हा मोबाईल बॅटरी सापडल्यामुळे कारागृहात नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.