नागपूर- दोन दिवसात जिल्ह्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या नरखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मोरे यांनी आत्महत्या केली होती. आज नागपूर शहर पोलीस विभागात कार्यरत असलेले विजय धोके यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते.
नागपूर : कॅन्सरग्रस्त पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या - विजय धोके
दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
![नागपूर : कॅन्सरग्रस्त पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4197125-1106-4197125-1566372113850.jpg)
नागपूर शहर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या विजय धोके यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ते 53 वर्षांचे होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय धोके यांना मुखाचा कर्करोग होता. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले, कुटुंबीयांसोबत चहा घेतला. मात्र, त्यानंतर घरातल्या एका खोलीत जाऊन त्यांनी गळफास घेतला.
काही वेळाने ही घटना त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना डॉक्टरकडे नेले. मात्र, तोवर विजय धोके यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मंगळवारी नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी त्यांच्या गावातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते नागपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यामुळे दोन दिवसात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने नागपूर शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.