नागपूर- बुटीबोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपासाच्या कामानिमित्त खापरखेडा येथे जात होते. त्याच वेळी वाहना समोर डुक्कर आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन दुभाजकावर आदळले. यावेळी वाहनातील सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रूग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी वाहन चालक खुशाल शेबोकर यांना मृत घोषित केले.
रानडुक्कराला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस वाहनाला अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - नागपूर अपघात बातमी
बुटीबोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपासाच्या कामानिमित्त खापरखेडा येथे जात होते. दरम्यान, वाहना समोर डुक्कर आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन दुभाजकावर जाऊन आदळल्याने वाहनातील सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले.
![रानडुक्कराला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस वाहनाला अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू police-jeep-accident-in-nagpur-one-dead](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7040714-thumbnail-3x2-nag.jpg)
police-jeep-accident-in-nagpur-one-dead
वन्यजीवाला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस वाहन चालकाकडून झाला. मात्र ही बाब त्याच्याच जीवावर बेतली. तर अन्य पाच कर्मचारी जखमी झाले. विशेष म्हणजे ज्या रानडुक्कराला वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला गेला ते डुक्करही वाहनाची धडक लागल्याने ठार झाले आहे.
हेही वाचा-बोरिस जॉन्सन अन् कॅरी सायमंड्स यांनी आपल्या मुलाचे 'हे' ठेवले नाव