नागपूर -नवीन वर्षाचे स्वागत होत असताना उपराजधानी नागपुरात गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी नागपूर पोलीस प्रशासनाने जम्बो पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तब्बल 4 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.
2018 साली पहिल्याच दिवशी झाली होती तिघांची हत्या
नागपूर शहर कायदा आणि सुव्यवस्थेचा दृष्टीने नेहमीच महत्वाचे राहिलेले आहे. 2018 साली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात तब्बल तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या. ज्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर गेल्यावर्षी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त केल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नव्हती. या वर्षीही पोलीस बंदोबस्त असणार आहे. शिवाय वाहतूक विभागाचे सातशे पोलीस कर्मचारी व अधिकारी देखील रात्रभर बंदोबस्तात तैनात असतील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातील उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रकालीन संचारबंदी सुरू असल्याने यावर्षी फारसा गोंधळ होण्याची शक्यता नसली तरी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.
शंभर ठिकाणी असणार पोलीसांची नाकेबंदी