नागपूर : वर्धा जिल्ह्यात बचतगटांचे काम करणाऱ्या 42 प्रभाग संघ व्यवस्थापक महिला तब्बल सात दिवसांपासून नागपुरातील संविधान चौक येथे आंदोनाला बसले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील या अपेक्षाने महिला बसल्या आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यां महिला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थाना बाहेर हनुमान चालीसा पठाण करणार होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारल्यामुळे आंदोलकर्त्या महिलांनी संविधान चौकात हनुमान चालीसाचे पठण केले आहे.
महिलांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन : 'युवा परिवर्तन की आवाज' वर्धा जिल्हाच्यावतीने आपले नेतृत्वात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत प्रभाग संघ आंदोलन सुरू करण्यात आले. 08 ते 10 महिने पासुन थकित असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे, त्यांना कामावरून कमी केलेल्या प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांना पुन्हा कामावर घेण्यात यावे या व इतर मागण्यासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या आहेत. 06 फेब्रुवारी पासून 40 महिलांच्या उपस्थितीत संविधान चौक नागपुर येथे बेमुदत गांधीगिरी आंदोलन सुरू आहे. परंतु अद्याप त्यांच्या मागण्याच्या संदर्भात तोडगा न निघाल्याने महिलांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पाठ करण्याचा पवित्रा घेतला होता.