महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Savaji Hotel Nagpur नागपूरच्या सावजी मटणाला दारूची जोड, पोलिसांनी चार धाब्याचा परवाना केला रद्द - सावजी मटन

नागपूर शहरातील सावजी हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विक्री केल्याच्या अनेक तक्रारी नागरपूर शहर पोलिसांकडे आल्या आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ( Police Commissioner Amitesh kumar ) यांनी हॉटेल चालकांना दारू विक्री किवा हॉटेलमध्ये दारू पिण्यास परवानगी ( Wine Selling And Drinking At Nagpur ) देण्यात येऊ नये असे आवाहन केले होते. मात्र तरीही दारू विक्री केल्याचे आढळून आल्याने चार सावजी हॉटेलचे ( Police cancelled 4 Savaji Hotel License ) परवाने पोलिसांनी रद्द केले आहेत.

Police cancelled 4 Savaji Hotel Licence Nagpur
हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विक्री

By

Published : Jan 10, 2023, 4:52 PM IST

नागपूर - शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार ( Police Commissioner Amitesh kumar ) यांनी दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचे आदेश जारी केले होते. त्यानुसार पोलिसांनी शहरातील सावजी हॉटेलवर कारवाई करत चार धाब्यांचा परवाना रद्द ( Police cancelled 4 Savaji Hotel Licence ) केला आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विक्री करण्यात ( Wine Selling And Drinking At Nagpur ) येऊ नये, किवा पिण्यासही परवाना देऊ नये, असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस आयुक्तांचे कारावाईचे आदेशशहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित टिकून राहण्यासाठी आता शहर पोलिसांनी शहरातील सावजी हॉटेल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही महिन्यापासून या सावजी हॉटेल्समध्ये बेकायदेशीर दारू विक्री आणि सेवन सर्रासपणे होत असल्याच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तांनी सर्व झोनच्या डीसीपीसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी शहरातील सावजी हॉटेल्सची तपासणी करुन ज्या सावजी हॉटेल्समध्ये नियमांचे उल्लंघन होते, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सावजी मटन ही नागपूरची खाद्य संस्कृतीनागपूरची खाद्य संस्कृती म्हणून सावजी मटन ( Savaji Mutton Nagpur ) जगप्रसिद्ध आहे. सावजी मटण खाण्यासाठी देशाच्या विविध भागातून खाद्य प्रेमी नागपूरला येतात. मात्र, हल्ली सावजी मटणाला दारूची जोड दिली जात असल्याने कुठेतरी नागपूरची खाद्य संस्कृती बदनाम होत आहे. झणझणीत सावजी मटनासोबतच दारू सेवन करण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन वाढताना दिसत आहे. विशेषतः तरुणवर्ग दारू पिण्यासाठी सावजी हॉटेलमध्ये गर्दी करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागपूर पोलिसांनी आता नियम मोडणाऱ्या सावजी हॉटेल्सविरुद्ध ( Savaji Hotel Nagpur ) कारवाईचा बडगा उभारला आहे.

गुमस्ता परवाना होईल रद्दनागपूर शहर पोलिसांनी शहराच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या काही सावजी धाब्यावर धाडी टाकल्या आहेत. यात चार ठिकाणी ग्राहक दारू पीत असल्याचे निदर्शनात आले होते. पोलिसांनी चारही धाब्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सावजी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांसोबत बैठक घेतली असून कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्नआठ दिवसात नागपूर शहरात चार हत्येच्या घटना घडल्या आहेत. सावजी हॉटेलमध्ये पार्टी करताना अनेकदा दारू पिण्यावरून वादविवाद होतो. त्यातून हिंसक घटना घडतात. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर पोलिसांनी सावजी हॉटेलमध्ये सरप्राईज धाडी टाकून बेकायदेशीर दारू विक्री किंवा पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेलविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details