नागपूर: सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चंद्रपूरच्या कारागृहातून मेडिकलमध्ये आलेल्या कैद्याला वॉर्ड क्रमांक 36 मध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी कैद्याचा 'एमआरआय' काढायला सांगितले होते. म्हणून त्याला घेऊन जात असल्याचे कारण सांगून पोलीस कर्मचारी कैद्याला घेऊन मेडिकल बाहेर पडले. मात्र, तिघेही चार ते पाच तासांनी रात्री उशिरा रुग्णालयात परतले. तेव्हा ते डोलत असल्याने डॉक्टरांना लक्षात आल्याने त्यांचे बिंग फुटले.
तक्रार दाखल: मेडिकलच्या कैदी वॉर्डातील कैद्यासह पोलीस कर्मचारी 5 तास गायब असल्यामुळे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार चंद्रपूर कारागृह अधीक्षकांकडे केली गेली. दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कैदी वॉर्डाची सुरक्षा वाऱ्यावर:नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दररोज विदर्भातील अनेक कैदी उपचारासाठी आणले जातात. उपचार होईस्तोवर त्यांना कैदी वॉर्डातच ठेवले जाते. मात्र, येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी कर्तव्यस्थळी दिसून येत नाही. एवढेच नाही तर कैद्यांसाठी आलेल्या बेडवर देखील पोलीस कर्मचारी झोपलेले दिसून येतात. आता तर कैद्यासह पोलिसांनी ओली पार्टी केल्याचे समोर आल्याने मेडिकल प्रशासनासह पोलीस विभाग देखील सतर्क झाला आहे.
मेडिकल रुग्णालयातून पळाला आरोपी: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील एक कैदी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथून पळून गेला होता. ही घटना 19 ऑक्टोबर, 2020 रोजी घडली होती. बंबईया उर्फ अब्बास इकबाल अली असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव होते. त्याच्यावर वर्धा येथील एका इसमाच्या खुनाचा आरोप होता. तो गेल्या वर्षभरापासून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंद होता. मात्र रविवारी त्याची प्रकृती खराब झाल्यानंतर त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच वेळी संधीचा गैरफायदा घेऊन बंबईया उर्फ अब्बास इकबाल अली पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. या घटनेची माहिती पुढे येताच पोलीस प्रशासन आरोपीला शोधण्याच्या कामाला लागले आहे. मात्र अद्याप त्याचा पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही.
हेही वाचा:
- Dry Fruits Theft: चोरट्यांचा चक्क सुक्या मेव्यावरच डल्ला; 18 हजारांचा माल लंपास
- Porn Video Case : संतापजनक! उद्यानात खेळायला आलेल्या अल्पवयीन मुलींना 'पॉर्न व्हिडिओ' दाखविला; विकृताला...
- Pune Crime : फक्त प्रसिद्धीसाठी तोतया IAS अधिकारी जायचा विविध कार्यक्रमांना; जाणून घ्या काय आहे प्रकरण