नागपूर -शहरात मागील एक वर्षापासून एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या देह व्यापार(सेक्स रॅकेट) वर पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. यात गरीब कुटुंबातील मुलींना पैश्याचे आमिष देऊन या व्यवसायात ओढत असत. या कारवाईत तीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. तर पिटा (Immoral Traffic (Prevention) Act, 1956) कायद्याअंतर्गत प्रियांका शोएब अफजल सैय्यद या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिकांना आला संशय -
नागपूरच्या मनीष नगरमधील दिलीप रेसेडेन्सी येथे प्रियांका ही राहत होती. मागील वर्षभरापासून ती या इमरातीतील फ्लॅट नंबर 402 मध्ये सेक्स रॅकेट चालावत होती. प्रियांका ही 34 वर्षाची आहे. तिचे पती हे हैद्राबादला राहत असून अधूनमधून ते नागपूरला येत होते. पण या व्यतिरिक्त येथे अनेक लोक ये जा करत असल्याने तेथील स्थानिक लोकांना संशय आला. त्यांनी याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना मिळाली होती. यावरून त्यांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत वेश्या व्यवसायात अडकलेल्या तीन मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर याप्रकरणी प्रियांकावर पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.