नागपूर : नागपुरातील प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा निघते. त्यावेळी नागपुरातील मुस्लिम बांधव शोभायात्रेत केवळ सहभागी होत, नाही तर रामावर गुलाब पुष्पांची उधळण करतात. नागपूर हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक असल्याचा संदेश ते देताता. पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जाते आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. हिंदूसह मुस्लिमसह इतर धर्माचे नागरिक उत्सवात सहभागी होतात. पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचे नव्हे तर, विदर्भाची सांस्कृतीक आणि धार्मिक ओळख आहे. मंदिराला शंभर वर्षांचा मोठा इतिहास आहे. एवढंच नाही तर मध्य भारतात प्रसिद्ध असलेल्या भव्य राम नवमीला निघणाऱ्या शोभायात्रेचा वारसा या मंदिराने जोपासला आहे.
पोद्दारेश्वर राम मंदिराचा इतिहास :ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर हे नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारी आहे. नागपुरातील धार्मिक कुटुंबातील जमनाधार पोद्दार यांनी १९१९ साली स्वखर्चाने मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९२३ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा जमनाधार पोद्दार यांच्या हस्ते झाला होता. त्यामुळेच या मंदिराला पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळखले जाते. आज या घटनेला ९९ वर्षांचा ऐतिहासिक काळ पूर्ण झाला असून, मंदिराने १०० वर्ष पूर्ण केले आहे. १९५२ साली जमनाधार पोद्दार यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा रामकृष्ण पोद्दार आणि त्यांची मुलं मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत.