नागपूर - कॉलरवाल्या वाघिणीच्या अंत्यसंस्कारवेळी भारतीयांचे सजीव प्राण्यांसाठीची सहानुभूती आणि संस्कृतीचे दर्शन झाल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ( PM Narendra Modi on Collarwali Tigress Funeral ) रविवारी 'मन की बात' या रेडिओ ( Man Ki Baat ) कार्यक्रमात बोलताना भावना व्यक्त केली. प्रत्येक सजीवासाठी सहानुभूती दाखवण्याचा हा स्वभाव भारतीय संस्कृतीत असल्याचेही ते म्हणाले. 15 जानेवारीला सुपर मॉम म्हणून ओळख असलेल्या कॉलरववाल्या वाघिणीच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात ( Pench Tiger Project ) मृत्यू झाला. यानंतर पतंप्रधानांनी आपली प्रतिक्रिया दिली.
निसर्गावर प्रेम करणे आणि सजीव प्राण्यांप्रती करुणामय स्वभाव व्यक्त करणे हीच आपली संस्कृती आहे. याचीच झलक नुकत्याच मध्यप्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात मरण पाववलेल्या कॉलरवाल्या वाघिणीच्या मृत्यूनंतर दिसून आली. कारण यावेळी तिच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने शोक आणि दुःख कॉलरवाल्या वाघिणीसाठी व्यक्त केला, की जणू त्यांच्यातील कोणीतरी जगाचा निरोप घेतला. या पद्धतीने दुःख आणि संवेदना व्यक्त करण्यात आली.