नागपूर :बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त सापडला (Samriddhi Highway Inauguration) आहे. 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी ते समृद्धी महामार्गसह माझी मेट्रोचे दोन मार्गिकेचे उदघाटन करणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती समोर आली असल्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात नागपूर येथे आयोजित नॅशनल सायन्स काँग्रेसचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (PM Narendra Modi inaugurated Samriddhi Highway) होईल. त्यामुळे 25 दिवसात नरेंद्र दोन वेळा नागपूरचा दौरा करणार आहे.
समृद्धी मार्गाचे उद्घाटन :विदर्भाला समृद्धीची वाट दाखवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार तरी कधी ? या एका प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या सुजान जनतेला हवे होते. दर पंधरा दिवसांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची नवीन तारीख पे तारीख जाहीर केली जात होती. त्यामुळे जनतेला सुद्धा कंटाळा आला होता. गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्ग उदघाटनाची किमान १० वेळा तारखा जाहीर झाल्या. मात्र, आता 11 डिसेंबर ही नवी तारीख जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर समृद्धी मार्गाचे उद्घाटन होईल हे देखील स्पष्ट होत (PM inaugurated Samriddhi Highway on 11th December) आहे.