नागपूर - बहुप्रतिक्षित नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी अजनी स्टेशनमध्ये प्रत्यक्षात हजर राहून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी हिरवा झेंडा दाखवून एक्सप्रेस रवाना केली.
अजनी-पुणे एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी व्हीसीव्दारे दाखवला हिरवा झेंडा - train
बहुप्रतिक्षित नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
नागपूर-पुणे आणि पुणे-नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याने या मार्गांवर अधिक गाड्या धावाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावाही केला जात आहे. नागपूर मार्गे पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या असल्याने प्रवाशांना पुण्यापर्यंतचा प्रवास करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सची मदत घ्यावी लागत होती. आज अजनी-पुणे हमसफर सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे आयोजित एका कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. प्रत्यक्षात अजनी स्टेशनवर हजर राहून राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी हिरवा झेंडा दाखवत हमसफर एक्सप्रेस रवाना केली. यावेळी स्थानिक आमदार आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.