नागपूर- गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील केवळ १४ शहरांमध्ये धावणारी मेट्रो आता १८ शहरांमध्ये धावू लागली आहे. २०१४ मध्ये देशातील मेट्रोचे जाळे २२६ किलोमीटर एवढे होते. तर गेल्या चार वर्षांत देशभरात ८५० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे निर्माण झाले आहे. केवळ साडे तीन वर्षांत नागपूरची माझी मेट्रो संचालित झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन
मजबूर सरकार गेल्यानंतर मजबूत सरकार आल्याने पब्लिक ट्रान्सपोर्ट क्षेत्रात विकास झाला आहे. या मेट्रोमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. नागपूरकरांच्या आनंदात सहभागी होता आले, याचा मला आनंद आहे, असे पंतप्रधान मोदी मराठीतून म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, २०१४ मध्ये ज्या प्रकल्पांचे शिलान्यास करण्याची संधी मिळाली होती, त्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा मान मिळाल्याने आनंदित आहे. ही मेट्रो देशातील ग्रीन मेट्रो पैकी एक असल्याने तसेच २०५० पर्यंत नागपूरची जनसंख्या दुप्पट होणार असल्याने भविष्यातील गरजेनुसार पब्लिक ट्रान्सपोर्ट तयार करण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले. मजबूर सरकार गेल्यानंतर मजबूत सरकार आल्याने पब्लिक ट्रान्सपोर्ट क्षेत्रात विकास झाला आहे. या मेट्रोमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. नागपूरकरांच्या आनंदात सहभागी होता आले, याचा मला आनंद आहे, असे पंतप्रधान मोदी मराठीतून म्हणाले.
आजचा दिवस नागपुरसाठी ऐतिहासिक आहे. २१व्या शतकातील खऱ्या विकासाची आज सुरुवात झाली आहे. प्रगतीसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही मेट्रो लाभकारक आहे. ६५ टक्के ऊर्जा सोलरच्या माध्यमातून अर्जित होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यास प्रचंड मदत होईल. आपल्याला वॉक टू वर्क कल्चर निर्माण करायचे आहे. तसेच खासगी वाहनांची संख्या कमी करणे हा महत्वाचा उद्देश आहे. मेट्रोमुळे नागपूरला नवी ओळख मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.