नागपूर - येथील वर्धा-नागपूर महामार्गावर असलेल्या मेट्रोच्या डबल-डेकर पुलाच्या सिमेंटचा प्लास्टरचा एक तुकडा पडल्याचे फोटो रविवारी व्हायरल झाले होते. यानंतर प्रशासनाकडून घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली.
शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे शहरात उभारले जात आहे. यात नागपूर-वर्धा मार्गावर असलेल्या डबल डेकर पुलाखाली एक्सटेन्शन होऊन मनीष नगरकडे मुख्य मार्गावरुन वळतानाच्या पुलाचा भाग आहे. याठिकाणी सध्या भेग पडलेली दिसून येत आहे. हा तुकडा पडल्याचे फोटो शहरात चांगलेच व्हायरल झाले. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्ते सुनसान असताना घडली. जर ही घटना एरवी दुसऱ्यावेळी घडली असती तर नक्कीच मोठा अपघात होऊन एखाद्याच्या जीवावर बेतली असती.
हेही वाचा -ठाकरे सरकारच्या चुकीमुळे 4 हजार 234 कोटी रु. विमा कंपन्याच्या घशात - अनिल बोंडे