नागपूर- लक्ष्मीनगरच्या बालजगत येथे बसोलीग्रुपद्वारे 'ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास' या विषयावर चित्रप्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नागपूर शहराच्या इतिहासावर चित्रे काढण्यात आली. गोंड राजा ते माझी मेट्रो, अशी शहरातील विविध ५० विषयांवर चित्रे रेखाटली गेली आहेत.
'ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास'; गोंड राजा ते माझी मेट्रो विषयावर चित्रप्रकल्प
नागपूरच्या लक्ष्मीनगरच्या बालजगत येथे बसोलीग्रुपद्वारे 'ऑरेंज सिटी ऑन कॅनव्हास' या विषयावर चित्रप्रकल्पाचे आयोजन करण्यात आले.
Nagpur
या चित्रप्रकल्पात जवळपास १७० चित्रकारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती, व्यावसायिक चित्रकार व बालचित्रकारांचा समावेश होता. मागील अनेक वर्षांपासून बसोली ग्रुपचे आयोजक चंद्रकांत चन्ने हे या चित्रप्रकल्पाचे आयोजन करतात. प्रत्येक चित्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदेश देत लहान मुलांना नागपूर शहराचा इतिहास समजणे, हा चित्रप्रकल्पाचा मुळ उद्देश आहे, असे चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले.