नागपूर - शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातामध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये शहरातीलच राजीव सिंग यांचा अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी नागपूर महापालिकेच्या रस्तेविभाग आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
...म्हणून चंद्रशेखर बावणकुळे अन् नागपूर महापालिकेविरोधात पोलिसात तक्रार
गेल्या ५ महिन्यांमध्ये खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा स्वतः बळी ठरलेले राजीव सिंग यांनी महापालिका आणि पालकमंत्री बावणकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली
गेल्या ५ महिन्यांमध्ये खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा स्वतः बळी ठरलेले राजीव सिंग यांनी महापालिका आणि पालकमंत्री बावणकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र, आम्ही गुन्हा दाखल करू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बघता उच्च न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका दाखल केली. तसेच नागपूर पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी किती लोकांवर कारवाई केली? याबद्दल विचारणा केली आहे.