नागपूर - महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा घेण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सामना रंगला असताना, आता सर्वसाधारण सभेला राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. त्यामळे मुंढे यांना दणका बसला आहे.
मुंढे यांनी नाकारलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेला राज्य सरकारची परवानगी - नागपूर पालिका न्यूज
नागपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभा घेण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सामना रंगला असताना, आता सर्वसाधारण सभेला राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. त्यामळे मुंढे यांना दणका बसला आहे.
लॉकडाऊन घोषीत झाल्यापासून गेल्या 3 महिन्यात महापालिकेची एकही सभा झाली नाही. यावरून सत्ताधारी भाजप व महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आमने-सामने आले होते. सत्तापक्ष भाजप सभा घेण्यावर आग्रही होता तर करोनाच्या काळात सभा घेणे योग्य होणार नसल्याचे कारण पुढे करत सभेला परवानगी नाकारली होती. शिवाय सभा आयोजीत करण्यावर राज्य सरकारचा अभिप्राय मागितला होता. ज्यावर नियम व अटी शर्तीचे पालन करीत सभा घेण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तब्बल तीन महिन्यांनी होणाऱ्या महापालिका सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.