नागपूर - भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. यावर मात करायची असल्यास प्रत्येकाने आपल्या घरी जल पुनर्भरण करण्याची गरज आहे. यासंबंधातील सुचना महापालिकेने नागरिकांना दिल्या असल्या तरी नागरिक याबाबतीत उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
नागपूर महापालिकेकडून जलपुनर्भरण प्रकल्प राबवण्याच्या सुचना; मात्र नागरिकांचे दुर्लक्ष
महापालिकेच्या आदेशानुसार काही नागरिकांनी जलपुनर्भरण प्रकल्प तयार केला आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा अधिक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे महापौर जिचकार म्हणाल्या.
सध्या राज्यात मान्सून दाखल झालेला आहे. मात्र, नद्या आणि धरणांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे पुढील वर्षी सुरळीत पाणीपुरवठा होईल याची शाश्वती नाही. शिवाय पावसाचे पाणी साठवण्याची कुठलीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाणी नदी, नाल्यांना वाहून जात आहे. त्यामुळे या पाण्याचा काहीही उपयोग होती नाही. तसेच पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यासाठी नागपूर महापालिकेने ३०० चौरस फूट बांधकाम असणाऱ्या घरांवर जल पुनर्भरण प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यासाठी महापालिकेकडे पक्के धोरण नसल्याचे दिसते. त्यामुळे नागरिक उदासीन असल्याचे दिसते.
महापालिकेच्या आदेशानुसार काही नागरिकांनी जलपुनर्भरण प्रकल्प तयार केला आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा अधिक नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे महापौर जिचकार म्हणाल्या.