नागपूर- भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बाईक रॅलीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५२ भाजप कार्यकर्त्यांवर चालान कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक उपायुक्त चिन्मय पंडित यांनी यासंबंधित माहिती दिली.
बाईक रॅलीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे भोवले, ५२ भाजप कार्यकर्त्यांवर चालान कारवाई - बाईक रॅलीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन
भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बाईक रॅलीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे भाजप कार्यकर्त्यांना चांगलेच भोवले आहे. बुधवारी फक्त बघ्यांची भूमिका घेतलेले वाहतूक पोलीस आता या कार्यकर्त्यांवर चालान कारवाई करणार आहेत.
केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्या जिल्ह्यात बाईक रॅलीतून वाहतूक नियमांची पायमल्ली
जे. पी. नड्डा बुधवारी नागपूर दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळ ते दीक्षाभूमी असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. कार्यकर्त्यांनी हेल्मेट न घालताच बाईक रॅली काढली. मात्र, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली होती. त्यानंतर अशा ५२ लोकांवर चालान कारवाई करण्यात येणार आहे.