महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाना पटोले माझे मित्र, त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा - नितीन गडकरी

नाना पटोले हे भाजपकडून खासदार म्हणून २०१४ ला निवडून आले होते. मात्र, त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊ काँग्रेसचा हात हातात घेतला.

By

Published : Mar 14, 2019, 4:09 PM IST

नितीन गडकरी

नागपूर- नाना पटोले माझ्याविरोधात उभे राहिले हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ते भाजपमध्ये होते तेव्हा माझे मित्र होते. आज ते पक्षात नाहीत तरी मित्र आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्यांनी पटोलेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया

नाना पटोले हे भाजपकडून खासदार म्हणून २०१४ ला निवडून आले होते. मात्र, त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊ काँग्रेसचा हात हातात घेतला. आता ते नितीन गडकरींच्या विरोधात रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे नागपूरची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. नितीन गडकरींच्या प्रचाराला पंतप्रधान मोदी स्वतः येणार असल्याचे बोलले जात आहे.


२०१४ च्या निवडणुकीत गडकरी २ लाख ८० हजार मतांच्या आघाडीने निवडून आले होते. यावेळी त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. यावेळी पटोलेंच्या उमेदवारीबाबत गडकरींना पत्रकारांनी विचारले. तेव्हा गडकरी म्हणाले, की ते माझे मित्र होते आणि आजही राहतील.

ABOUT THE AUTHOR

...view details