नागपूर - राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जरी मिळाली नसली तरी त्यांना भविष्यात यापेक्षा मोठे पद मिळेल, असे वक्त्यव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. तसेच ते भाजपचे हिरो असल्याची स्तुतीही त्यांनी यावेळी केली. ते कन्हान येथे भाजपचे उमेदवार टिकमचंद सावरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
बावनकुळे भाजपचा हिरा, त्यांना मोठी जबाबदारी देणार - मुख्यमंत्री - devendra fadnavis latest news kanan nagpur
बावनकुळे यांच्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. ते आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना या पेक्षाही मोठे पद देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
हेही वाचा -मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर कामठी विधानसभा मतदारसंघात आणि त्यांच्या समाजात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदा सार्वजनिक मंचावरून स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच बावनकुळे यांच्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. ते आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना या पेक्षाही मोठे पद देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.