महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पक्षाने आदेश द्यावा, मोदी विरोधात वाराणसीत लढतो- खासदार धानोरकर - Raj Bhavan siege protestNagpur

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आज काँग्रेसतर्फे 'राजभवन घेराव' आंदोलन करण्यात आले. यावेळी, पक्षाने आदेश करावा महाराष्ट्रातून वाराणसीत जाऊन मोदींविरोधात लढाई लढण्याची तयारी असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

MP Balu Dhanorkar News
खासदार धानोरकर

By

Published : Jan 16, 2021, 8:23 PM IST

नागपूर -शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आज काँग्रेसतर्फे 'राजभवन घेराव' आंदोलन करण्यात आले. यावेळी, पक्षाने आदेश करावा महाराष्ट्रातून वाराणसीत जाऊन मोदींविरोधात लढाई लढण्याची तयारी असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

बोलताना खासदार बाळू धानोरकर

हेही वाचा -नागपूरमध्ये राजभवनला घेराव घालत काँग्रेसचे आंदोलन

मोदींचा ट्रम्प करतो...

आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात राजभवन घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढायला तयार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, निवडणुकीत लढलो नाही तर नावाचा बाळू धानोरकर नाही, असेही ते म्हणाले.

भाजप काँग्रेसची पैदास आहे..

भाजप ही काँग्रेसची पैदास आहे. पक्षाने आदेश करावा, मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, आता पेट्रोल 100 रुपयावर तर डिझेल 90 रुपयावर पोहोचले आहे. झोपली का ही दळभद्री सरकार, असे म्हणत सरकारला देशाचे काही देने घेणे नाही. त्यांनी या देशाचे वाटोळे केले. पण, आता शांत बसणार नसल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

हेही वाचा -५० हजारांची लाच घेताना समाज कल्याण अधिकाऱ्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details