महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वांच्या प्रयत्नातून कोरोनावर मात, लसीकरण मोहिमेला साथ द्या-जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे - join the vaccination campaign

मागील वर्षी कोविडच्या काळात नागरिकांना अनेक अडचणी आल्या. पण सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. हे नवीन वर्ष सर्वांचे आनंदाचे भरभराटीचे जावो अशी आशा करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या.

लसीकरण मोहिमेला साथ द्या
लसीकरण मोहिमेला साथ द्या

By

Published : Jan 26, 2021, 10:41 AM IST

नागपूर - जिल्हाधिकारी कार्यलयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ध्वजवंदन करत सर्वांना शुभेच्या दिल्या. मागील वर्ष हे कोविडमुळे अडचणीचे होते. पण सर्व जनतेच्या प्रयत्नाने त्यावर मात करण्यात यश आले आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले.

लसीकरणाला चांगला द्यावा

त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या दिल्या. उपास्थित सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व नागरिकांना येणारे वर्ष हे आनंदाचे भरभराटीचे जावे अशा शुभेच्या दिल्या. मागील वर्षी कोविडच्या काळात नागरिकांना अनेक अडचणी आल्या. पण सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. हे नवीन वर्ष सर्वांचे आनंदाचे भरभराटीचे जावो अशी आशा करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या. लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी या व्यक्त केली.

हेही वाचा -पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

ABOUT THE AUTHOR

...view details