महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपल्या ट्रान्समिशन लाईन्स सायबर हल्ला होण्याइतक्या आधुनिक नाहीत - बावनकुळे - Bavankule oppose Anil Deshmukh

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना, चार तास वीज पुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर सेलचा हात असल्याचा दावा केला. या संदर्भात भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहमंत्री देशमुख यांनी केलेल्या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Chandrasekhar Bavankule
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Mar 2, 2021, 5:05 PM IST

नागपूर -गेल्यावर्षी 12 ऑक्टोबर रोजी संपूर्ण मुंबई अंधारात गेली होती. या घटनेमागे चीनचा हात असल्याचे संकेत अनेक वेळा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना, चार तास वीज पुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर सेलचा हात असल्याचा दावा केला. या संदर्भात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पॉवर फेल हे मानवी चुकांमुळे झाले होते, मात्र आपले अपयश लपवण्यासाठी आणि राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी धाधांत खोटा दावा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

माहिती देताना माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

हेही वाचा -लग्न समारंभात वधू-वरासह नातेवाईकांची कोविड चाचणी; नरखेड तालुक्यातील घटना

मुंबई सारख्या महत्वाच्या शहरात चार-चार तास वीज पुरवठा खंडित होण्यासारखी घटना या आधी कधीही घडली नव्हती. ही घटना आधुनिक महाराष्ट्राची बदनामी करणारी घटना असल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावेळी केले होते. वीज पुरवठा खंडित होण्याच्या पूर्वीच म्हणजे, तीन दिवसांपासून कळवा तळेगाव विद्युत वाहिनी बंद पडलेली होती. या कडे महावितरण कंपणीने साफ दुर्लक्ष केल होते. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी कळवा-पडगे ही वीज लाईन बंद पडली. त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर मात्र कळवा-पडगा दुसरी लाईन बंद झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली होती. म्हणून त्यांनी चौथी लाईन बंद केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. केवळ मानवी चुकांमुळेच मुंबईवर ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली होती. मात्र, आता आपल्या चुका लपवण्यासाठी राज्य सरकारचे मंत्री खोटे दावे करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

मुंबईत एक मिनीट जरी वीजपुरवठा खंडित झाला, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र, अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा अनर्थ होऊ शकला असता. या करिता दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली. ऊर्जा मंत्रालयाने आपली चूक मान्य केली असती आणि भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये या करिता उपाययोजना करू, अशी ग्वाही जरी दिली असती तरी हा विषय इथेच संपला असता. मात्र, आपली चूक लपवण्यासाठी चीनच्या सायबर सेलवर खापर फोडण्याचे काम मंत्री करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. या संदर्भात केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाला पत्र पाठवून या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे देखील ते म्हणाले.

ट्रान्समिशन लाईन्स आधुनिक नाहीत

आपल्या ट्रान्समिशन लाईन्स सायबर हल्ला होण्याइतक्या आधुनिक नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. सर्व कामकाज हे मॅन्युअलीच केले जाते. केवळ आपली चूक दुसऱ्यांना दिसू नये, या करिता एकाद्या मंत्र्याने अशा प्रकारे दिशाभूल करणे गंभीर असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा -बुटीबोरी एमआयडीसीतील स्नेहा फार्मसिटीकल कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details