नागपूर- राज्य सरकारने मराठी भाषा विभागासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही करत आहोत. या अर्थसंकल्पात ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा अपूर्णच राहिली असल्याने ही मागणी सरकारने अगोदर पूर्ण करावी, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक डॅा. श्रीपाद जोशी यांनी केली.
या अर्थसंकल्पातही आमची मागणी अपूर्णच.. हेही वाचा-१५०० आदर्श शाळांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प; तरतूद मात्र शून्य
मराठी भाषा सक्ती केवळ दहावीपर्यंत न करता बारावीपर्यंत करावी, तसेच मराठी भाषा विभागासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी करायला पाहिजे होती, असेही जोशी म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करणार तसेच याविषयी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. यावर बोलताना श्रीपाद जोशी म्हणाले की, मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी विद्यापीठ महत्वाचे आहेत. म्हणून मराठी विद्यापीठांची निर्मिती राज्यसरकारने करावी.