नागपूर:पुढच्या दोन महिन्यांत राज्य सरकार कोसळेल आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule on Sanjay raut) म्हणाले की, पुढील काळात आमचे विधानसभेतील संख्याबळ 164 वरुन 184 होईल. किमान २० ते २५ आमदारांचा आम्हाला छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही. असं बावनकुळे म्हणाले.
राजकीय वादांत न पडता विकासाची कामे करू - बावनकुळेराज्यातील राजकीय स्थिती गोंधळलेली आहे. उद्या काहीही होऊ शकतं. त्यावर दोन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असे संजय राऊत म्हणाले. याबाबत बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, राजकीय वादांत न पडता विकासाची कामे करू, असे दानवेंनी म्हटले आहे. राजकारणात उद्या काय होईल, हे कुणालाही सांगता येत नाही. नुकतेच आपण पाहिले की, उद्धव ठाकरेंच्या हुकूमशाहीला कंटाळून त्यांचे ५० आमदार बाहेर पडले आणि त्यांचे सरकार पडले. पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.