महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आमची बाजू भक्कम, निकालाची काळजी नाही - देवेंद्र फडणवीस - Rahul narvekar

Shiv Sena MLA disqualification case : गेले अनेक दिवसांच्या तारीख पे तारीख नंतर अखेर शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहेत. त्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निकाल लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 4:02 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना

नागपूर Shiv Sena MLA disqualification case : उद्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता, आमची बाजू भक्कम असल्याने निर्णय आमच्याच बाजूने लागणार आहे. तसंच, विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय देतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. ते आज मंगळवार (९ जानेवारी) रोजी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कायद्याचे उल्लंघन होणार नाही :आमची बाजू कायदेशीर पातळीवर पूर्णपणे भक्कम आहे. त्यामुळे कसलीही चिंता करण्याची गरज नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणात योग्य निर्णय देतील. तसंच, आम्ही कायदा पाळतो. त्यामुळे कायद्याचे कुठेच उल्लंघन होणार नाही असं म्हणत निकाल आपल्याचं बाजूनं लागेल असा ठाम विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय.

2 लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्रे : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. 20 डिसेंबर 2023 रोजी ही सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्रं दाखल करण्यात आलीत. तसंच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली.

48 तासांत येणार निकाल : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत घ्यायचा आहे. यामुळे आजपासून पुढच्या जास्तीत जास्त सुमारे 48 तासांच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र होणार, की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार उलट-सुलट चर्चा सुरूय.

ABOUT THE AUTHOR

...view details