नागपूर- हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा रुग्णालयातील आज पाचवा दिवस आहे. रुग्णालयातर्फे पीडितेच्या प्रकृतीबद्दल माहिती सांगण्यासाठी सायंकाळी मेडीकल बुलेटिन काढण्यात आले.
हिंगणघाट जळीतकांड; पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न, प्रकृती धोक्याबाहेर नाही - हिंगणघाट जळीत कांड अपडेट
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा रुग्णालयातील आज पाचवा दिवस आहे. रुग्णालयातर्फे पीडितेच्या प्रकृतीबद्दल माहिती सांगण्यासाठी सायंकाळी मेडीकल बुलेटिन काढण्यात आले.
हिंगणघाट जळीतकांड अपडेट
आज तिसऱ्या ड्रेसिंगनंतर पीडितेच्या प्रतिजैविक (अँटी बायोटिक्स) गोळ्या वाढविण्यात आल्या आहेत. कृत्रिम अन्ननलिका लावून अन्न देण्यात आले. कालपासून रक्तदाब स्थिर नसल्याने त्यासाठी आवश्यक औषधे देण्यात येत आहेत. तरुणीची प्रकृती स्थिर आहे. मात्र, अद्यापही धोक्याबाहेर नसल्याची माहिती ऑरेंज सिटी रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.
हेही वाचा -हिंगणघाट प्रकरण : उज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू