नागपूर- नागपूरसह विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. आज नागपूरात ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे नागपूरमध्ये आॅरेंज हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागपूरकर हैराण झाले आहेत.
नागपुरात सुर्यनारायण तळपला; 'आॅरेंज हाय अलर्ट' जारी - temperature
येणारे काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
येणारे काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून नापूरात तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले आहे. नागरिक अत्यंत तातडीचे काम असल्यासच बाहेर पडत आहेत. बाहेर निघताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण चेहरा आणि शरीर झाकूनच लोक बाहेर पडतानाचे चित्र दिसत आहे. तसेच शाळादेखील सकाळी ११ वाजेपर्यंत घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. त्याचबरोबर पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.