मुंबई - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde Land Scam Allegation ) यांच्या नागपूरमधील 16 भूखंडातील अनियमितता प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Opposition Leader Ambadas Danve ) यांनी स्थगन प्रस्ताव मांडत, मुख्यमंत्री शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या ( Opposition Party Aggressive ) सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेचे सभागृह ( Legislative Council ) 15 मिनीटसाठी तहकूब करण्यात आले.
CM Eknath Shinde Land Scam मुख्यमंत्र्यांच्या 16 भुखंडाचे प्रकरण तापले, विधान परिषदेत तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष आक्रमक - विधान परिषदेत विरोधी पक्ष आक्रमक
नागपूर सुधार प्रन्यासच्या ( NSP Land Scam ) जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde Land Scam ) यांच्यावर विरोधकांकडून ( Opposition Party Aggressive) आरोप करण्यात येत आहेत. विधान परिषदेत ( Legislative Council) या प्रकरणी विरोधकांनी गदारोळ करुन मुख्यमंत्र्यांच्या राजिनाम्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चौैकशीची मागणी केली. त्यावरुन गदारोळ झाल्याने सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
बिल्डरला दोन कोटीत विकला भूखंडनागपूर सुधार प्रन्यासाच्या ( NSP Land Scam ) माध्यमातून 83 कोटी रुपयांचे भूखंड दोन कोटी रुपयांना बिल्डरला विकल्याचे प्रकरण न्यायालयात उघडकीस आले. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde Land Scam Allegation ) यांच्या राजीनामाची मागणी लावून धरली आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण तापले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Opposition Leader Ambadas Danve ) 289 द्वारे स्थनग प्रस्ताव मांडला. आदिवासींसाठी असलेला भूखंड बिल्डरला विकल्याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. नागपूर प्रन्यासचे आदेश वाचून दाखवला सुरूवात केली. सत्ताधाऱ्यांनी यावरून गदारोळ कारायला सुरुवात केली. त्यामुळे तालिका अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी पंधरा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.
दुसऱ्या दिवशी ही पडसादमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde Land Scam Allegation ) यांनी ८० कोटींचा भूखंड अवघ्या २ कोटी रुपयात विकल्याच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Nagpur Winter Session ) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी ( Opposition Party Aggressive ) सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी लावून धरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse ) यांनीही विरोधी पक्षनेत्याच्या मागणीला पाठिंबा दिला. सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने सुरुवातीला 10 मिनिट, नंतर दोन वेळा 15 आणि शेवटी दिवसभरासाठी परिषदेचे ( Legislative Council ) कामकाज स्थगित करावे लागले होते.