महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन हॅक, भाजप आमदार खोपडे यांचा आरोप - नेत्यांचे फोन हॅक

विरोधी पक्षातील आमदारांचे फोन हॅक होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. कृष्णा खोपडे यांना फोन हॅक केले जात असल्याचं पत्र प्राप्त झालं आहे.

Opposition leader's phone hacked, BJP MLA krishna Khopde accuse
विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन हॅक, भाजप आमदार खोपडे यांचा आरोप

By

Published : Jul 30, 2020, 5:07 PM IST

नागपूर -विरोधी पक्षातील आमदारांचे फोन हॅक होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. कृष्णा खोपडे यांना फोन हॅक केला जात असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. यात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन हॅक करत असल्याची महिती नमूद केली आहे. याप्रकरणी खोपडे यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. आता ते विरोधी पक्षातील आमदारांचे फोन हॅक करून त्रास देत असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

सोपान पाटील यांच्याकडून हे पत्र मिळाले असून, मनीष भागाडे याच्या नावाचा यामध्ये उल्लेख असल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले. एवढच नाही तर सोपान पाटील हे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे बंधू असल्याची माहिती खोपडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details