नागपूर -विदर्भातील पूरस्थितीला प्रशासनाचा विसंवाद जबाबदार आहे. वेळीच सूचना दिल्या असत्या तर इतके नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आजपासून ते विदर्भातील पूरगस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर माध्यमांशी ते बोलत होते.
बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, कोल्हापूर येथे मागील वर्षी पूरग्रस्तांना जे खास शासन निर्णय लावून मदत केली होती. त्याचप्रमाणे विदर्भालाही त्या सर्व योजना लागू करा, अशी मागणीही केली आहे. यावेळी शासनाचा संवाद अपुरा पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. वेळीच संवाद किंवा पुराबाबत नागरिकांना सूचना दिल्या असत्या तर इतके मोठे नुकसान झाले नसते, असे ते म्हणाले.
पूरात मोठी वित्त हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने खास शासन निर्णय घेऊन पूरग्रस्तांना मदत करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. शिवाय या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांसह चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना स्थितीवर बोलतांना फडणवीस म्हणाले की, शासन नुसते बदल्या करण्यामागे लागले आहे. बदलीसाठी पैसा लागतो. सध्या कोरोनाचा काळ आहे त्यामुळे बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. मात्र, तसे न होता सर्व मंत्री, प्रशासन व शासन फक्त अधिकाऱ्यांच्या बदली मागे लागले आहे. त्यामुळे अपेक्षित समन्वय होत नसल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. बदलीसाठी 500 कोटी रुपये भत्ता लागलो. शासनाकडे तेवढी रक्कम आहे का ? त्यामुळे पैसे नसतांनाही 15 टक्के बदल्या का ?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे बदल्या व्यतिरिक्त कोणी लक्षच देत नाही. हे निर्णय चूकीचे असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा -VIDEO : पुरात अडकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला प्लास्टीक टबच्या सहाय्याने वाचवले, व्हिडिओ व्हायरल