महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ऑक्सिजन गळती होऊन रुग्णांचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी; अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी लागेल'

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारे ऑक्सिजनच्या व्यवस्थेत गळती होऊन मृत्यू होणे धक्कादायक आहे, याची कारणे काय आहेत ती पुढे येतील. मात्र, सध्या इतर रुग्णांना तत्काळ दुसरीकडे गरज असल्यास हलवण्यात आले पाहिजे. घटनेचा सखोल चौकशी वैगेर होत राहील, पण आता दुसरी कुठे अशी घटना घडू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. या घटनेत मृत्यू झालेल्या कृटुंबीयांच्या दुःखात आम्ही सामील आहोत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर
नागपूर

By

Published : Apr 21, 2021, 3:50 PM IST

Updated : Apr 21, 2021, 3:59 PM IST

नागपूर- नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारे ऑक्सिजनच्या व्यवस्थेत गळती होऊन मृत्यू होणे धक्कादायक आहे, याची कारणे काय आहेत ती पुढे येतील. मात्र, सध्या इतर रुग्णांना तत्काळ दुसरीकडे गरज असल्यास हलवण्यात आले पाहिजे. घटनेचा सखोल चौकशी वैगेर होत राहील, पण आता दुसरी कुठे अशी घटना घडू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. या घटनेत मृत्यू झालेल्या कृटुंबीयांच्या दुःखात आम्ही सामील आहोत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर

राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल असलेल्या २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान, अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरू झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Apr 21, 2021, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details