महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली - देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या भरवशावर केली होती का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

Opposition leader devendra fadnavis
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 17, 2019, 3:02 PM IST

नागपूर -मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. आम्ही त्याची आठवण करून दिल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत घोषित करा या मागणीसाठी विरोधकांनी सुरू केलेल्या गोंधळात विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज स्थगित करावे लागले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या भरवशावर केली होती का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही सत्तेत असताना राज्याच्या भरवशावर शेतकऱ्यांना मदत केली होती. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांसोबत विश्वासघात करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

हेही वाचा -नागपूर हिवाळी अधिवेशन - महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details