नागपूर- राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. त्यातच राज्य शासनाने सोमवारपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने विचारपूर्वक घ्यावा. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे इतर राज्यांतील उदाहरणे लक्षात घेऊनच हा निर्णय शासनाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते सध्या पदवीधर निवडणूकीच्या अनुशगांने नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे हा निर्णय अद्याप संबंधित जिल्ह्यांना बंधनकारक करण्यात आलेला नाही. मात्र, काही जिल्ह्यात सोमवारपासून ९ ते १२ वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेण्यात यावा, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
आरटीपीसी चाचणी खर्च शिक्षकांवर लादू नका-