महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जखमी वाघाचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला - devlapur

जिल्ह्यातील देवलापार जवळील हरनकुड जवळ नागपूर जबलपूर हा राष्ट्रीय महामार्गावर ओलांडून जात असताना वाघाला एका वाहनाने धडक दिली. या धडकेत वाघ गंभीर जखमी झाला.

tiger

By

Published : Feb 4, 2019, 12:18 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील देवलापार जवळील हरणकूंडजवळ नागपूर जबलपूर हा राष्ट्रीय महामार्गावर ओलांडून जात असताना वाघाला एका वाहनाने धडक दिली. या धडकेत वाघ गंभीर जखमी झाला. जखमी वाघाने वनविभागाच्या बचाव पथकातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला. रितेश भोंगडे, असे त्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

tiger

नागपूर-जबलूर महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत हा वाघ गंभीर जखमी झाला आहे. जखमी वाघ घाबरुन हरणकूंड परिसरातील जंगलात लपून बसला. वनविभागाचे बचाव पथक वाघाला वाचविण्यासाठी हरणकूंड परिसरात दाखल झाले. शोधमोहीम सुरू केली असता, जखमी वाघाने पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात भोंगाडे जखमी झाले असून त्यांना देवलापर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्र झाल्याने वाघाची शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. वाघ जखमी असल्याने आणखी लोकांवर हल्ला करू नये, म्हणून परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details